कुडाळ मालवण मधून निलेश राणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ-२६९ मधून आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मा. श्री. निलेश नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्री. रवींद्र चव्हाण , श्री. दीपक केसरकर , खासदार नारायण राणे , आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, श्री.दत्ता सामंत, राष्ट्रवादीचे श्री. काका कुडाळकर आदी उपस्थित होते.