कुडाळ-कसाल दरम्यान राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग भरारी पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुसह केला २६ लाखाचा मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर कुडाळ-कसाल दरम्यान राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग भरारी पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुसह २६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उस्मानाबाद येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १८ लाख दारु व टेम्पो, इतर मालासह तब्बल २६ लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सिंधुदुर्ग यांनी केली आहे.
शनिवारी सकाळी ०५.३० वाजण्याच्या सुमारास कसाल (ता. कुडाळ) येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहन तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईनुसार एका मालवाहृटेम्पोमध्ये छुप्या पध्दतीने वाहतूक होत असताना गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा बनावटीची विदेशी दारुचे ३०० बॉक्स जप्त करण्यात आले. दारुची १८ लाख व टेम्पो, इतर मालासह ८ लाख मिळूण २६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अमजद शेरखान पठाण ( वय २३ वर्षे, रा. येरमळा, ता. कळंब जिल्हा उस्मानाबाद) याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.
ही जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार निरीक्षक शरद जाधव विशाल सरवटे दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जगन चव्हाण वाहनचालक यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक व्हि. के. सरवटे करीत आहेत.