राजापूर सहाय्यक गटविकास अधिकारीपदी निलेश जगताप यांची पदोन्नती

34

राजापूर सहाय्यक गटविकास अधिकारीपदी निलेश जगताप यांची पदोन्नती

सावंतवाडी : प्रतिनिधी 

  देवगड येथील पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी  निलेश जगताप यांची नुकतीच राजापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आल्याचे पत्र शासनाकडून प्राप्त झालेले आहे.

  श्री जगताप यांनी आपल्या वीस वर्षांच्या सेवेतील तेरा वर्षे देवगड तालुक्यात प्रभावीपणे सेवा बजावलेली आहे. या काळात महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीॅमार्फत तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवणे अशी विविध विधायक व लोकाभिमुख कार्ये करून त्यांनी देवगड तालुक्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या  कारकिर्दीत बापर्डे येथील ग्रामपंचायत शाश्वत विकास संकल्पना  मधील  स्वच्छ आणि हरित गाव  या थीम मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी ग्रामपंचायत म्हणून दिल्ली मध्ये गौरव करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान मध्ये सन 2019-20 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हात प्रथम क्रमांक, कोकण विभागात प्रथम क्रमांक तसेच राज्यात प्रथम आली होती. तसेच जिल्हा स्मार्टग्राम या पुरस्कारासाठी व गावातील 100%महिला स्वयंसहायता समूहात सहभाग घेऊन SHG 37 गटाची निर्मिती, बचता गटांना कर्ज वाटप, अशा शासकीय  विविध योजना राबविण्यासाठी बापर्डे ग्रामपंचायतिला जगताप यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
ग्रामपंचायत किंजवडे सोलर ऊर्जेवर वीज निर्मिती करणे. PDI या इंडेक्स मध्ये महाराष्ट्र मध्ये किंजवडे ग्रामपंचायत पहिल्या तीन मध्ये आली आहे. सन 2024-25 मध्ये राष्ट्रीय कार्यशाला मध्ये शाश्वत विकासाच्या 17 उदिष्टे व सामाजिक दृष्ट्या शांतता  व न्यायपूर्ण गाव या संकल्पनेचे सादरीकरण देशातील मोजक्या ग्रामपंचायत मध्ये सादरीकरण करण्याच्या संधीमध्येही जगताप  यांचे मोठे योगदान आहे .त्यांना राजापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारीपदी बढती मिळाल्याने त्यांचे देवगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे.