कदंबा चालकास मारहाण प्रकरण | आरोपींची निर्दोष मुक्तता | ॲड. विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम

सिंधुदुर्ग : कदंबा चालकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याच्या गुन्ह्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपीं तर्फे ॲड. विवेक मांडकुलकर यांनी काम पहिले होते.

दि. २५/०८/२०१६ रोजी कदंबा ट्रान्सपोर्ट वास्को राज्य गोवा या बसने २०-२५ प्रवासी वास्को गोवा ते सोलापूर असे जात असताना रात्री जेवणासाठी हॉटेल व्हिवा कोकण येथे कदंबा चालक बस मधून उतरत असताना २ ते ३अज्ञात इसमांनी त्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याची फिर्याद देण्यात आली होती. सदर केसचे कामी आरोपी राजेश कृष्णा सावंत, राकेश कृष्णा सावंत, विनोद नामदेव तळेकर सर्व रा.माजगाव ता. सावंतवाडी यांना दि.२५/०८/२०१६ रोजी अटक करून ओरोस येथील मे.सत्र न्यायालयात भा. द. वि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४,५०६,३४ अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

याकामी सरकार पक्षाकडून एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते. मात्र साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व संशयित आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.जे. भारूका यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड.प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.