बांद्यात धान्य दुकानाला आग…!

बांदा : बांदा येथील धान्य व्यापारी स्वप्नील वसंत पावसकर यांच्या धान्य दुकानाला आग लागली. ग्रामस्थ धीरज भिसे यांना छपरातून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबबतची माहिती व्यापाऱ्यांना दिलीय. स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून आग विझवली.

सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, तलाठी वर्षा नाडकर्णी आदींनी नुकसानीची पाहणी केली.