देवगड (प्रतिनिधी)२१ ऑगस्ट २०२४
नौकेवर चहा करत असताना स्टोव्हचा भडका भाजलेल्या ५० वर्षीय खलाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू
देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून कपड्याने पेट घेतला व त्या भडक्यात गंभीर भाजलेल्या आडिवरे डोंगरवाडी येथील संजय महादेव पाटील (वय ५० )यांचा २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून कपड्याने पेट घेतला . या झालेल्या भडक्यात संजय महादेव पाटील (वय ५० )आडिवरे डोंगरवाडी हे गंभीररित्या भाजले होते.त्यांना तात्काळ देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचाराकरिता ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असताना २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद दामोदर भागोजी नाटेकर रा गावडे आंबेरी यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करीत आहेत.





