पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू ; प्रकरण गुलदस्त्यात ? पोलीस व महसूल प्रशासन काय भूमिका घेतली आपले सर्वांचे लक्ष
मळेवाड येथील चिरेखाणीमध्ये अपघाती म्रुत्यु पावलेल्या मुलीच्या प्रकरणी मळेवाड चौकात अपघाती मृत्यू पावलेल्या मुलीच्या प्रकरणाची चर्चा रंगू लागली असून य़ा घटनेची कसून चौकशी झालीच पाहिजे असाही सूर उंमटत आहे.
मळेवाड कोंडुरे परिसरात मोठ्या प्रमाणात चिरेखाण व्यवसाय चालतो.मळेवाड येथील एका चिरेखाणीवर आठ दहा दिवसापूर्वी एक लहान मुलगी शौचालयाला गेली होती.याच वेळी ती शौचालयाला बसली असताना एक चिरे भरलेला टेम्पो चालकाने मागे घेत असताना चिमुरडी न दिसल्याने तो टेम्पो त्या मुलीवर चढल्याने मुलीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.मात्र या अपघाताची कुठेही नोंद न करता खाण मालकाने अपघाती मृत्यू पावलेल्या मुलीच्या आई-वडिलांना रोख रक्कम देत त्यांच्या गावी पाठवले.
या प्रकरणाची गुप्तता पाळून कोणालाही थांगपत्ता न लावता अपघाती मृत्यू पावलेल्या मुलीची विल्हेवाट लावल्याची चर्चा मळेवाड चौकात सुरू आहे.हा प्रकार खूपच किळसवाणा व माणूस तिला काळीमा फासणारा असल्याने याची कसून चौकशी झाली पाहिजे असाही सूर उमटत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि आता महसूल विभाग कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे