Home अपराध सावंतवाडी येथील दोघा तरुणांवर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

सावंतवाडी येथील दोघा तरुणांवर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

560

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) २० ऑगस्ट २०२४

सावंतवाडी येथील दोघा तरुणांवर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन दोन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील दोघा तरुणांवर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी याप्रकरणी संशयित दोघाना ताब्यात घेण्यात आले आहे. आनंद लक्ष्मण मादर (रा. कोलगाव, मुळ रा. बेळगाव) व कमलेश नलावडे (रा. सालईवाडा) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

संशयित दोन युवकांनी मुलींना फूस लावून सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील दोन अल्पवयीन कॉलेज युवतीवर अत्याचार केल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांडून देण्यात आली आहे. हा प्रकार पाच महिन्यापूर्वी घडला. याबाबतचा ही माहिती नातेवाईकांना दोन दिवसांपूर्वी मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली.एका मुलीने वेंगुर्ला तर एकीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व उद्या त्यांना येथील न्यायालयात जर करण्यात येणार आहे. दरम्यान यातील एक युवक हा बाजारपेठेत भाजी विक्रेत्याकडे काम करतो. दरम्यान संबंधित अत्याचारग्रस्त मुलीबरोबर एका युवकाची ओळख गावात सेंट्रिंगच्या कामासाठी आला असता एका मुली बरोबर झाली.त्या नंतर संशयित त्या मुलीला भेटायला आपल्या मित्राला सोबत घेऊन आला असता तिच्या बरोबर असलेल्या तिच्या मैत्रिणी बरोबर त्याच्या मित्राची ओळख झाली आणि याच ओळखीचा फायदा य़ा संशयित आरोपींनी उठवत अत्याचार केला.ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्या ठिकाणची पोलीस अधिक तपास करत आहे.आज पोलीस दोन्ही संशयितांना न्याय़ालयात हजर करणार आहेत.