देवगडमध्ये नारळी पौर्णिमा उत्साहात
देवगड : प्रतिनिधी
सागराला नारळ अर्पण करून देवगड तालुक्यात नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.सोमवारपासून खोल समुद्रातील मासेमारीला खèया अर्थाने सुरूवात झाली.
देवगड येथे तारामुंबरी, मळई, देवगड समुद्रकिनारी भागात नारळीपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देवगड बंदरावर उद्योगपती नंदकुमार घाटे, नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्या हस्ते शासकीय पुजा करण्यात आली व त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.यावेळी कस्टम निरिक्षक के.एम्.नाबर, पोलिस नाईक प्रविण सावंत आदी शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक व मच्छिमार उपस्थित होते.जामसंडे मळई खाडीकिनारीही बाल मंडळ संगीत मेळा मळईतर्फे सागराला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली.मळई खाडीमध्ये मच्छिमारी नौकांनाही पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मळईतील ग्रामस्थ सुदाम कोयंडे यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधीवत पुजा करण्यात आली.त्यानंतर महाआरती,गाèहाणे करून नौकांमधुन मळई ग्रामस्थ व मच्छिमारांनी सागराला नारळ अर्पण केला.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर,प्रदोष कोयंडे,जयप्रकाश कोयंडे, राजाराम कोयंडे,रूपेश मणचेकर, विनोद कोयंडे, सचिन मुणगेकर, नंदकुमार वाडेकर, अजित कोयंडे, सुरेश मणचेकर,अनिकेत कोयंडे, हेमंत मणचेकर, नासीर खान, दिपराज मेस्त्री,सतिश कोयंडे, मुरारी भाबल, रqवद्र तारकर, बाळकृष्ण राजम, विक्रम बांदकर, सुनील कोयंडे,प्रभाकर कोयंडे,महेश पांचाळ,दादू वाडेकर, बाबी हिरनाईक,शिवराज कोयंडे आदी मळई ग्रामस्थ मच्छिमार व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
तारामुंबरी येथे सागराला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली.सायंकाळी ५ वाजता तारामुंबरी विठ्ठलमंदीराकडून सुवर्णश्रीफळ व कलशासह भव्य मिरवणुक काढण्यात आली.






