बांदा (मंगल कामत)१९ ऑगस्ट २०२४
सातार्डा हायस्कूलला विशाल परब यांच्यातर्फे एअर गन व शैक्षणिक साहित्य प्रदान
सातार्डा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून एक एअर गन, स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी देणगी तसेच विद्यार्थ्यांना दप्तरे आणि वह्या वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद माजी महिला व बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांच्या हस्ते एअर गन मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कवठणी सरपंच अजित कवठणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश आरोंदेकर, आप्पा पारिपत्ये, शाळा समिती अध्यक्ष नारायण हळदणकर, माजी संस्था अध्यक्ष महेंद्र मांजरेकर, शाळा समिती सदस्य शुभम पिळणकर, सौ. शर्मिला मांजरेकर, माजी उपाध्यक्ष रघुनाथ कवठणकर, मुख्याध्यापक प्रशांत सावंत, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी काही दिवसांपूर्वी सातार्डा हायस्कूलला भेट दिली होती. त्यावेळी शाळेच्या क्रीडा प्रकारातील रायफल (एअर गन) देण्याचे त्यांनी मान्य केले होते. तसेच मुतारी दुरुस्तीसाठी देणगी व पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दप्तरे व वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष नाईक यांनी केले. प्रशालेतर्फे विशाल परब यांचे आभार मानण्यात आले.
——-





