सावंतवाडी तालुक्यातील मायनिंग खाण प्रकल्प धोक्यात ; या गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश ; मायनिंग विरोधी संघर्ष समितीतून समाधान
सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील आजगाव ब्लॉगमध्ये जे एस डब्ल्यू व मळेवाड तळवणे ब्लॉकमध्ये फोमेन्तो या दोन मोठ्या मायनिंग कंपन्यांचे प्रकल्प या ठिकाणी सुरू होणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेतया दोन्ही ठिकाणी मायनिंग प्रकल्प होऊ नये म्हणून शेतकरी व ग्रामस्थांतून फार मोठा विरोध दर्शवण्यात येत असतानाच आता नव्याने जाहीर झालेल्या इको सेन्सिटिव्ह झोन मधील गावांच्या यादीमध्ये या दोन्ही प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या बऱ्याच गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये झाल्यामुळे आता हे मायनिंग प्रकल्प अडचणीत आले आहेत.यामुळे मायनी विरोधी संघर्ष समिती यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.आजगाव ब्लॉग मधील भूम व मळेवाड तळवणे ब्लॉग मधील कोंडुरे,गुळदुवे व दांडेली या गावांचा समावेश आहे.तर सावंतवाडी तालुक्यातील साटेली या गावातही मोठ्या प्रमाणात मायनिंग चा प्रकल्प सुरू होता आता हेही गाव पुन्हा इको सेन्सिटिव्ह झोन मधील गावांमध्ये आल्याने या गावातील सुरू असलेला मायनिंग प्रकल्प धोक्यात आला आहे.मात्र इको सेन्सिटिव्ह झोनमुळे मायनिंग प्रकल्प जरी अडचण आले असले तरी सर्वसामान्य जनतेला व स्थानिक शेतकऱ्यांना या इकोसिंसिटीव्हमुळे काही गोष्टींसाठी अडचणी निर्माण होणार आहेत.यात शिथीलता द्यावी अशी ही मागणी स्थानिकातून करण्यात येत आहे.सावंतवाडी तालुक्यातील 68 गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येणाऱ्या गावांची यादी खालील प्रमाणे आहे. *सावंतवाडी तालुक्यातील गावे शिरशिंगे, आंबोली, गेळे, सावरवाड, वेर्ले, सांगेली, ओवळीये, आंबेगाव, माडखोल, कुणकेरी, पारपोली, नेने, देवसु, मसुरे, केगद, दाणोली, भोम, निरुखे, चराठे, केसरी, फणसवडे, कारिवडे, बावळाट, सावंतवाडी, ब्राह्मणपाट, सरमळे, दाभिल, उडेली, कोनशी, घारपी, माजगाव, असनिये, तांबोळी, कुंभवडे, डेगवे, बांदा, पडवे माजगाव, पडवे, दांडेली, मडुरा, आरोस, गाळेल, कोंडुरे, सातार्डा, डोंगरपाल गुळदुवे, साटेली तर्फ सातार्डा या गावांचा समावेश आहे.*