कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचे लोकापर्ण दिमाखात ; सुशोभिकरण कामाचे खा. राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलं कौतुक

22

कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचे लोकापर्ण दिमाखात ; सुशोभिकरण कामाचे खा. राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलं कौतुक

कणकवली शहराच्या सौंदर्यात भर, विविध प्राण्यांचे कलाकृती लक्षवेधी

*कणकवली दि.९ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)*

सार्वजनिक बांधकाम विभागाने कणकवली रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभिकरण, गार्डन वेगवेगळी शिल्प, वेगवेगळ्या कलाकृती अशा प्रकल्पाचे दिमाखात लोकार्पण शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कामाचे खा. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कौतुक केले.

 

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण रेल्वे कार्पोरेशन संचालक आर. के. हेगडे,वाघदत्त राव, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री. रावले, प्रादेशिक रेल्वे प्रबंधक श्री. कांबळे, रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी उप नगराध्यक्ष बंडू हर्णे, आदीसह अधिकारी, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी शंभर फूट उंच उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर तीस फुटी राष्ट्रध्वज आजच्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विंदाची राणीची बाग या बालउद्यानाचे फित कापून तसेच मुख्य प्रवेशद्वार, मंडप, शिल्प, या सर्वांचे अनावरण करून आणि दीपप्रज्वलन करून कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.