मायनिंग प्रकल्पाविरोधात आजगाव ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी विचार विनिमय बैठक संपन्न
सावंतवाडी – प्रतिनिधी
आजगाव दशक्रोशीत होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाबाबत विचारविनिमय बैठक शुक्रवारी संध्याकाळी आजगाव ग्रामपंचायत येथे संपन्न झाली.यावेळी पर्यावरण तज्ञ सदानंद गवस (गोवा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजगाव दशक्रोशीतील धाकोरे, भोम,शिरोडा,आरवली,सागरतीर्थ आसोली,मळेवाड गुळदुवे,नाणोस या गावातील 840 हेक्टर (सुमारे 2100 एकर) जमीन क्षेत्रात जेएसडब्ल्यू कंपनीकडून मायनिंग प्रकल्पाचा राबविण्यात येणार आहे.यामुळे या भागातील जैवविविधता त्याचप्रमाणे शेती उध्वस्त होणार आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाही होणार आहे.या सर्वच परिणाम सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर होणार आहे.आरोग्याची फार मोठी समस्या निर्माण होणार आहे.यामुळे मायनिंग प्रकल्प ज्या गावांमध्ये होऊ घातला आहे त्या गावातून प्रखर विरोध दर्शवण्यात आलेला आहे.या प्रकल्पाला संघर्ष करत असताना कशा पद्धतीने तो करावा याकरिता आजगाव ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी संघर्ष समितीतील सदस्य उपस्थित होते.या उपस्थितांना गोवा येथील पर्यावरण प्रेमी सदानंद गवस उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी कशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून या मायनिंग प्रकल्पाला विरोध करता येईल यासाठी उपयुक्त माहिती दिली आणि हा प्रकल्प रद्द होण्यासाठी मी कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहुन ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागेल त्या त्यावेळी आपण मार्गदर्शन करेन असे आश्वासनही दिले.यावेळी आजगाव सरपंच सौ यशस्वी सौदागर उपसरपंच पिंट्या कामतेकर भोम सरपंच सौ वाडकर मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे गुळदुवे माजी सरपंच रुपेश धर्णे,रविंद्र धर्णे कायदेविषयक सल्लागार अँड.भरत प्रभूआजगावकर तसेच संघर्ष समिती मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी या प्रकल्पा विरोध करण्यासाठी आजगाव दशक्रोशी पर्यावरण बचाव संघाची स्थापना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.प्रकल्प बाधित ज्या गावातील लोकप्रतिनिधी किंवा शेतकरी ग्रामस्थ उपस्थित नव्हते अशा गावातील व्यक्तींसह पुन्हा एकदा बैठक घेऊन विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवण्याचे यावेळी ठरवण्यात आले. आरवली सरपंच समीर कांबळी ,माडखोल संजय लाड (वीज ग्राहक मंच ,सावंतवाडी अध्यक्ष ) ,खनिजकर्म तज्ञ मामा शिंदे ,आजगाव माजी सदस्य प्रशांत काकतकर ,पर्यावरण प्रेमी राजेश आजगावकर ,ओंकार प्रभूआजगावकर,निल झांटये ,धाकोरा माजी सरपंच अजित नातू ,प्रसाद मेस्त्री,पप्पू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.





