सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी दिविजा वृद्धाश्रमात दिल्या 50 बेडशीट भेट
कणकवली (प्रतिनिधी) दिनांक १० जुलै २०२४
कणकवली येथील उद्योजक राजेंद्र उर्फ राजू मानकर यांच्या वाढदिवस विविध उपक्रम विविध सामाजिक उपक्रमाने कणकवली तालुक्यात पार पडला.
उद्योजक राजू मानकर हे आपला वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतात समाजातील गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक खर्च, त्यांना आवश्यक असणारी शैक्षणिक सामग्री आपल्या माध्यमातून देत असतात.
आपण या समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने आपला वाढदिवस आहे अशा पद्धतीने दरवर्षी साजरा करतात. यावर्षी त्यांनी कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमास भेट देऊन वृद्धाश्रमास 50 बेडशीट भेट स्वरूपात दिले आहेत.
देवगड तालुक्यातील शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळ व राजू व राजू मानकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मानकर मानकर यांच्या वाढदिवस सेवाभावी वृत्तीने साजरा केला जातो. दिविजा वृद्धाश्रमाचे पदाधिकारी यांच्या जवळ मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी हे 50 बेडशीट सुपूर्द केले .यावेळी राजू मानकर मित्रमंडळाचे पदाधिकारी व शिवप्रसाद मित्र मंडळ देवगडचे पदाधिकारी उपस्थित होते





