तळेबाजार येथील धोकादायक वृक्ष अखेर सा.बा.वी हटविला

40

तळेबाजार येथील धोकादायक वृक्ष अखेर सा.बा.वी हटविला

देवगड (प्रतिनिधी) 10 जुलै 2024

देवगड निपाणी मुख्य मार्गावरील तळेबाजार येथील मार्गानजीक वाळलेल्या स्थितीत एक मोठा वृक्ष होता.धोकादायक स्थितीत असलेला हा वृक्ष कधीही कोसळून देवगड निपाणी मार्ग बंद होण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून आले. संभाव्य धोका लक्षात घेता देवगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बासूदकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावून तात्काळ हा वृक्ष जेसबीच्या साहाय्याने बाजूला करून संभाव्य धोका टाळला , याबद्दल तळेबाजार पंचक्रोशीतील वाहनचालकामधून समाधान होत आहे.