भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांची रेडी जि.प.कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी यांच्याशी विकास कामासंदर्भात चर्चा

8

 

वेंगुर्ला – प्रतिनिधी ९ जुलै २०२४

भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांची रेडी जि.प.कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी यांच्याशी विकास कामासंदर्भात चर्चा

 

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.राजन तेली साहेब यांनी हाॅटेल मेघदूत शिरोडा येथे रेडी जि.प.मधील रेडी,शिरोडा,आरवली, सागरतीर्थ, भाजप पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन जिल्हा परिषद मधील प्रत्येक गावातील विकास कामासंदर्भात चर्चा करताना कमी बजेटची अशी कामे लोकप्रतिनिधी व भाजप कार्यकर्ते यांनी सूचवावी त्या प्रमाणे येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बजेट मध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

आरवली सरपंच समीर कांबळी यांनी सोन्सूरे येथे होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाला आपल्या गावाचा विरोध आहे तरी आपण आमच्या सोबत आहात काय असा प्रश्न उपस्थित केला असता मा.राजन तेली साहेब यांनी सांगितले मी तुमच्या सोबत आहे व या आंदोलनात सुध्दा सहभागी होईन असे आश्वासन दिले त्याच प्रमाणे भाजप आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक यांनी सागरतीर्थ, आरवली,शिरोडा येथील तीन्ही गावातून जाणारा व्हाळ साफ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते हा व्हाळ साफ करुन कायम स्वरूपी बांधण्यात यावा अशी मागणी केली असता या विषयी या कामात येणाऱ्या अडचणी वर मात करुन कशा प्रकारे ग्रामपंचायत यांनी प्रस्ताव करुन संबधित अधिकारी यांच्याकडे कसा पाठवावा हे मार्गदर्शन त्यांनी केले प्रस्ताव आल्यानंतर आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करु त्यानंतर आरवली सरपंच समीर कांबळी यांनी मुख्यमंत्री सडक योजनेत आरवली सोन्सूरे येथील रस्ता मंजूर झाला असून त्यांचे अजूनपर्यत काम सुरु न झाल्यामुळे रस्ता खड्डेमय झाला आहे ते खड्डे चतुर्थी पूर्वी तरी खड्डे बुजवण्यात यावे असा विषय आला असता मा.राजन तेली साहेब यांनी सांगितले की ज्यांने रस्त्याचे काम घेतले त्यांच्याकडून खड्डे बुजवण्यात येतील त्यानंतर सतत जाणारी लाईट व शिरोडा धोंडवाडी येथील गेली दोन वर्षे मोडून पडलेले लाईटचे खांब या विषयी भाजप शिरोडा कार्यकर्ते दादा शेटये यांनी प्रश्न उपस्थित केला असता त्या संबधित वीज अधिकारी यांच्याशी मा.राजन तेली साहेब यांनी चर्चा करुन माहिती घेतली लवकरच हा विषय निकाली काढण्यात येईल त्यानंतर ब-याच विकास कामांच्या विषयावर चर्चा झाली.

या वेळी शिरोडा ग्रामपंचायत विदयमान सदस्य मयूरेश शिरोडकर,माजी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,भाजप वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,रेडी जि.प. विभाग प्रमुख अमित गावडे,शिरोडा भाजप उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,शिरोडा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,भाजप शिरोडा ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,अनिल गावडे,मनोहर होडावडेकर,दत्ताराम फटजी शिरोडा भाजप पदाधिकारी योगेश वैदय,शिरोडा,रेडी,शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे विदयाधर धानजी,जगन्नाथ राणे,भाजप रेडी अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर,उपाध्यक्ष ओकांर कोनाडकर,भाजप रेडी पदाधिकारी उत्तम कांबळी,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त,मळेवाड ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते