मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा कळसुली मध्ये प्रारंभ आमदार नितेश राणे यांचे विशेष सहकार्य – सरपंच सचिन पारधिये

6

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा कळसुली मध्ये प्रारंभ आमदार नितेश राणे यांचे विशेष सहकार्य – सरपंच सचिन पारधिये

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी जाहिर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची कळसुली गावामध्ये प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली. सदर योजना गावामध्ये यशस्वी करण्यासाठी आमदार श्री.नितेशजी राणे यांच्या सहकार्याने व त्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, सरपंच, श्री. सचिन पारधिये, उपसरपंच, श्री. गणेश मठकर, तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत गावातील सर्व महिलांचे अर्ज भरुन घेण्यात येवून, सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन करण्याचे काम ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्याकडून सुरु करण्यात आले असल्याचे कळसुली गावचे सरपंच सचिन पारधिये यांनी सांगितले.

. यावेळी प्राथमिक स्वरुपात सौ. स्मिता संतोष सावंत, यांचा अर्ज ऑनलाईन करुन, सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सदर अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. आमदार नितेश राणे साहेबांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल गावातील महिलांनी आभार व्यक्त केले. 

तरी सर्व महिलांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच, श्री. सचिन पारधिये, यांनी उपस्थितांना केले.