शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक शाळा मळेवाडच्या विद्यार्थी पद्मनाभ पाटणकरचे यश

14

सावंतवाडी (प्रतिनिधी) दि ३जुलै २०२४

शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक शाळा मळेवाडच्या विद्यार्थी पद्मनाभ पाटणकरचे यश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत श्री कुलदेवता विद्यामंदिर  परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मळेवाड नंबर 2 चा विद्यार्थी पद्मनाभ विद्याधर पाटणकर हा जिला गुणवत्ता यादीत 39 वा तर सावंतवाडी तालुक्यातून 9 वा आला. वर्गशिक्षक विजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल केंद्र प्रमुख म ल देसाई, शाळेचे मुख्याध्यापक लवू सातार्डेकर, पदवीधर शिक्षक शामसूदर कळसूलकर, शिक्षिका शामल कळसूलकर व जयश्री हरमलकर मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी अभिनंदन केले.