सावंतवाडी : सावंतवाडी गांधी चौक येथील हॉटेल ताराच्या समोर जेनेरिस्टार या कंपनीचे फ्रेंचायशी जनलोक मेडिकलचे सावंतवाडी प्रांत अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. ब्रँडेड कंपनीची औषधे आणि जेनेरिक औषधे ही प्रभावी असतात आणि त्यांची किंमत ही ब्रँडेडच्या किमतीपेक्षा निम्मी असते.
सर्व सामान्य माणसांना परवडणारी ही औषधे डॉक्टरानी लिहिली पाहिजेत जेणेकरून सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही आणि लोकांना दर्जेदार औषधे मिळतील. कॅन्सरसह सर्व रोगावरील औषधे उपलब्ध करून लोकांना सेवाभावी वृत्तीने मदत करावी असे मनोगत प्रांत साहेब यांनी व्यक्त केले.
यावेळी जनेरिस्टार कंपनीचे पार्टनर पराग सावंत, जनलोक मेडिकल चे प्रो.प्रा. महेश परुळेकर , महाराष्ट्र माझा चे पत्रकार हेमंत मराठे, सामाजिक बंधीलकीचे रवी जाधव, उत्तम जाधव, वासंती तेंडोललकर, सौ सावंत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.





