कनेडी राडा प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी…!

३०७ मधील आरोपींना ९ फेब्रुवारी पर्यंत तर ३५३ मधील आरोपींना १० पर्यंत पोलीस कोठडी…

कणकवली : कनेडी येथील भाजप – शिवसेना राड्यातील संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरून अटक केलेल्या ठाकरे शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान त्या प्रकरणातील आरोपींना ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

याप्रकरणी मंगेश रामचंद्र सावंत (वय ४८,भिरंवडे ), कुणाल विजय सावंत ( वय -३४, रा.सांगवे), योगेश रमाकांत वाळके ( वय ४२, रा.कनेडी), यांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर पोलिस हवालदार राजेंद्र नानचे यांच्या तक्रारी वरून आयपीसी ३५३ मधील ४ आरोपींना कणकवली न्यायलयाने १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली पंरतु न्यायालयाने सुनावणी दरम्यान आरोपींना १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिल राजाराम पांगम ( वय ५८, सांगवे), संतोष वसंत आग्रे ( वय ४९, फोडांघाट ), संदीप बाळकृष्ण गावकर ( वय ३२, सांगवे ), तुषार श्यामसुंदर गावकर ( वय २९, सांगवे ) यांचा समावेश आहे.

कुंभवडे माजी सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे यांच्या तक्रारीवरून ३०७ कलमनुसार गुन्हा दाखल झालेल्या श्रीकांत नारायण सावंत (५०, भिरवंडे) , राजेश मधुकर पवार (५१, दिगवळे ), निखिल प्रकाश आचरेकर (३९, कणकवली) यांना ९ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.