अटक केलेल्या ४ आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी…!

कणकवली : कनेडी येथील झालेल्या राडा प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणि शासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्यापासून त्यांना अटकाव केल्याप्रकरणी आयपीसी ३५३ मधील ४ आरोपींना कणकवली न्यायलयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

या पोलीस कोठडीत अनिल राजाराम पांगम ( वय ५८, सांगवे), संतोष वसंत आग्रे ( वय ४९, फोडांघाट ), संदीप बाळकृष्ण गावकर ( वय ३२, सांगवे ), तुषार श्यामसुंदर गावकर ( वय २९, सांगवे ) यांचा समवेश आहे.

याप्रकरणी वकील अविनाश परब आणि भूषण बिसुरे यांनी आरोपींच्या वतीने काम पाहिले तर सरकारी पक्षाच्या वतीने नितीन कुंठे यांनी काम पाहिले.