मणचे येथील नुकसानग्रस्त घराची युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली पाहणी
देवगड(प्रतिनिधी)
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात मनसे देवळवाडी येथील विजय अनमाने यांच्या घरावर नजीकची दगड कोसळून त्यांचे आर्थिक नुकसान झाले या अनुषंगाने शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी जाऊन विजय अनमाने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक व वस्तुरुपी मदत दिली.
घटनास्थळी देवगड तहसीलदार संकेत यमगर, मंडळ निरीक्षक श्री शेटे, सरपंच दीपक तोरस्कर उपसरपंच मन्सूर सोलकर तंटामुक्ती अध्यक्ष सईद सोलकर, ग्रामसेवक विनायक कुंभार, पोलीस पाटील सिताराम घाडी उपविभाग प्रमुख गुरुनाथ मेस्त्री व अन्य उपस्थित होते. घटना स्थळी तहसीलदार देवगड यांनी पाहणी करून संबंधित कुटुंबांची तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून दरड हत्विण्यासासाठी ग्रामपंचायत मार्फत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ पत्र व्यवहार करण्यात यावा व दरड हटविण्याचे काम करण्यात यावे. अशी सूचना तहसीलदार देवगड यांनी सरपंच मणचे यांना यावेळी दिली.





