कृष्णाजी सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन 

30

कृष्णाजी सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन 

कणकवली (प्रतिनिधी )

कणकवली तालूक्यातील नाटळ हुमलेटेंब वाडी येथील रहिवाशी कृष्णाजी शंकर सावंत ८८ यांचे शानिवार दि. २९ जून रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुली, जावई, नातवंडे , भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना कणकवली येथील शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते.

त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. माझी निवृत्त एसटी महामंडळाचे कर्मचारी दिलीप राणे यांचे ते सासरे होत.