वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयितांना अटक ; १९ जून पर्यंत पोलीस कोठडी मुख्य संशयीताचा शोध सुरू

757
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":2,"transform":2,"effects":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयितांना अटक ; १९ जून पर्यंत पोलीस कोठडी मुख्य संशयीताचा शोध सुरू

देवगड (प्रतिनिधी)दि १४ जून २०२४

वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना देवगड पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रणव राजन नारिग्रेंकर (२६) मूळ राहणार इळये पाटथर, सध्या राहणार पितृछाया अपार्टमेंट राम मंदिर जवळ जुने डोंबिवली, हरीश दिलीप आचरेकर (१९) मूळ रा. वाडा आचरेकरवाडी सध्या राहणार वाफी गुजरात,
या दोन संशयीतांची नावे आहेत. या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीस विरार येथून ताब्यात घेतला असून त्याला शनिवारी देवगड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे. अशी माहिती देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.
देवगड तालुक्यातील वाडा येथे बंद घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून घरातील रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याची घटना वाडा भटवाडी येथे घडली दिनांक १६ मे ते ६ जून या कालावधी ही चोरीची घटना घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी वय ६५ राहणार वाडा भटवाडी या १६ मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. त्या घराच्या बाहेर परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते तेही २९ मे रोजी मुंबईला गेले होते. ते मुंबईहून परत आल्यानंतर ६ जून रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या घरी गेल्यानंतर घराच्या मागील दरवाजा फोडलेला दिसला त्यांनी याबाबत वैशाली घाडी यांना फोनवरून कळविल्यानंतर त्यांनी त्या वाडा येथे गावी आल्या. व त्यावेळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजा फोडून चोरट्याने आत प्रवेश करून रोख रक्कम दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव,आशिष कदम, स्वप्निल ठोंबरे,यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमने ही भेट देऊन तपासाला सुरुवात केली होती.
याबाबतची सविस्तर तक्रार देवगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली.
या चोरीमध्ये अज्ञात चोरट्याने बंद घराच्या मागील दरवाजा फोडून एकूण ५ लाख ५५ हजाराची चोरी झाली असल्याचे माहिती फिर्यादी वैशाली घाडी यांनी पोलिसांना दिली असून यामध्ये ४० हजार किमतीचे ३ तोळ्याचे मंगळसूत्र, २५ हजार किमतीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र, २५ हजार किमतीची २ तोळ्याची पीळ असलेली चैन, १५ हजार किमतीच्या ५ सोन्याच्या अंगठ्या यामध्ये ५ ग्रॅमची एक व ३ ग्रॅमच्या ४ अंगठ्या , १० हजार किमतीचे ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले व १ ग्रॅम सोन्याची पट्टीतील नथ, ४० हजार किमतीचे चांदीचे ब्रेसलेट व कंबर साखळी अशी पाव किलो चांदी, ४ लाखाची रोकड यामध्ये ५०० रुपयांच्या ४०० नोटा, १०० रुपयांच्या १ हजार नोटा, २०० रुपयांच्या ५०० नोटा असा या चोरीतील नोटांचा तपशील आहे.असे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून १ लाख ५५ हजार किमतीचे दागिने व ४ लाखाची रोकड असे मिळून एकूण ५ लाख ५५ हजाराची चोरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून केली.या अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वि कलम ३८०,३५७ अन्वये देवगड पोलिसात पुन्हा दाखल केला होता.
त्यानुसार देवगड पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने तपासाची चक्रे फिरविली. मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या चोरी प्रकरणातील प्रणव राजन नारिग्रेंकर (२६) मूळ राहणार इळये पाटथर, सध्या राहणार पितृछाया अपार्टमेंट राम मंदिर जवळ जुने डोंबिवली, हरीश दिलीप आचरेकर (१९) मूळ राहणार वाडा आचरेकरवाडी सध्या राहणार वाफी गुजरात, या दोन संशयित युवकांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले. ४००० रुपये किमतीचा कॅनॉन कंपनीच्या कॅमेरा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांना गुरुवारी रात्री देवगड पोलीस स्थानकात आणण्यात आले. शुक्रवारी त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मुख्य संशयित हा वाडा गावातीलच असून त्यालाही देवगड पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी विरार येथून ताब्यात घेतले आहे. शनिवारी देवगड पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात येणार आहे अशी माहिती देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.