कणकवली तालुका वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा १६ जूनला सत्कार

34

कणकवली दि.१०जून (तुळशीदास कुडतरकर)

कणकवली तालुका वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा १६ जूनला सत्कार

 

कणकवली तालुका वैश्य समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा १६ जूनला सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कणकवली तालुका वैश्य समाजा मार्फत १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनियर विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव सोहळा रविवार दिनांक १६ जून रोजी सायंकाळी ३.३० वाजता योगीराज भालचंद्र महाराज आश्रम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

तरी १० वीत ८० टक्के आणि १२ वी मध्ये ७० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांचा, पदवीधर उत्तीर्ण झालेल्या वैश्य समाजातील विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत निवृत्ती धडाम झेंडा चौक, बाजारपेठ कणकवली येथे जमा करुन नियोजित कार्यक्रमादिवशी आपल्या पालकांसह बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्य समाज अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर, सचिव गुरुनाथ पावसकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नीलम धडाम, 9423884416, गुरुनाथ पावसकर 9307002628, विलास कोरगावकर 9422381667 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.