Home Uncategorized पक्षाचे दोन गट होऊनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्रात व देशांमध्ये...

पक्षाचे दोन गट होऊनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्रात व देशांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल पवारांचे कौतुक करावे तेवढे कमी – नंदकुमार घाटे

48

पक्षाचे दोन गट होऊनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्रात व देशांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल पवारांचे कौतुक करावे तेवढे कमी – नंदकुमार घाटे

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन देवगडात उत्साहात साजरा

देवगड, दि.१० जून

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने देखील देवगड येथील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

राज्याच्या राजकारणात प्रभाव असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे.राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999 साली झाली तेव्हापासून आम्ही शरदचंद्र पवार यांच्या कार्याला प्रेरित होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकार रुजवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले असले तरी आम्ही नेहमीच आमचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांच्याच पाठीशी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात व देशांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल शरदचंद्र पवार यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.या वयातही पक्ष टिकवण्यासाठी त्यांची धडपड पाहून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही देवगड तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र आमच्यासह आमचे कार्यकर्ते झटत असल्याचा विश्वास देखील यावेळी जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी व्यक्त केला.

यावेळी तालुका सरचिटणीस शरद शिंदे,बाबा आचरेकर,सुधीर देवगडकर,प्रदीप कोयंडे,उदय रूमडे, बाबू वाळके,बंटी वाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.