मुणगे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेदरम्यान पूर्व वैमनस्याच्या रागातून झाली मारहाण १ जखमी ;
देवगड (प्रतिनिधी) दि ६ जून २०२४
मुणगे ग्रामपंचायतचे ग्रामसभेत पूर्व वैमनस्याच्या रागातून सभेला बसलेल्या दिगंबर राजेंद्र महाजन वय ३५ राहणार मुणगे वाघोळीवाडी यांच्या डोक्यावर खुर्ची मारून जखमी केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून ही घटना गुरुवार ६ जून रोजी १२:१५ सुमारास मुणगे ग्रामपंचायत कार्यालयात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुणगे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये गुरुवार दिनांक ६ जून रोजी ग्रामसभा होती.
या ग्रामसभेमध्ये दिगंबर राजेंद्र महाजन बसले होते. सभेतील मनोज सखाराम सावंत(३०) व त्यांचे सहकारी योगेश प्रकरण योगेश प्रकाश सावंत (४०)व प्रकाश शिवाजी सावंत (६०) रा. मुणगे सावंतवाडी यांनी पूर्ववैमनसस्याच्या रागातून अचानक महाजन यांच्या डोक्यावर खुर्ची दोनवेळा घातली. यामुळे त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवगड येथे दाखल करण्यात आले.
याबाबत महाजन यांनी देवगड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी मनोज सखाराम सावंत, योगेश प्रकाश सावंत, व प्रकाश शिवाजी सावंत, या तिघांविरुद्ध भादवी कलम ३२४,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करत आहेत.