वाडा येथे बंद घर फोडले ; रोकड व दागिने लंपास
देवगड प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वाडा येथे बंद घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून घरातील रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याची घटना वाडा भटवाडी येथे दिनांक १६ मे ते ६ जून या कालावधी ही चोरीची घटना घडली
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी वय ६५ राहणार वाडा भटवाडी या १६ मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. त्या घराच्या बाहेर परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते. तेही २९ मे रोजी मुंबईला गेले होते ते मुंबईहून परत आल्यानंतर ६ जून रोजी सकाळी ६:३० वाजता सुमारास ते त्यांच्या घरी गेल्यानंतर घराच्या मागील दरवाजा फोडलेला दिसला त्यांनी याबाबत वैशाली घाडी यांना फोनवरून कळविल्यानंतर त्या गावी आल्या . त्यावेळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजा फोडून चोरट्याने आत प्रवेश करून रोख रक्कम दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव आशिष कदम स्वप्निल ठोंबरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमने ही भेट देऊन तपासाला सुरुवात केली. याबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत देवगड पोलीस ठाण्यात सुरू होती.





