पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या गौरवशाली राज्यकारभाराचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन त्यांचे गुण आपण आचरणात आणले पाहिजेत – – डॉ. पंकज पाटील
उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ .पंकज पाटील यांचे हस्ते देवींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले .
यावेळी डॉ. पंकज पाटील म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवीं च्या गौरवशाली राज्यकारभाराचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन त्यांचे गुण आपण आचरणात आणले पाहिजेत. त्या एक उत्कृष्ठ प्रशासक व आदर्श राज्यकर्त्या होत्या.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे , किसन ठोंबरे , श्रीम चारशिला सावंत , अशोक नारकर , सुशिल परब , किर्ती पवार श्री. कुंभार , पांडूरंग गोरे , वैभव फाले , वैभव जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आभार श्री. किसन ठोंबरे यांनी व्यक्त केले .