देवगड तालुका पेन्शन असोसिएशनच्या वतीने गुणवंता प्राप्त दहावी बारावी विद्यार्थ्यांचे सत्कार

86

देवगड तालुका पेन्शन असोसिएशनच्या वतीने गुणवंता प्राप्त दहावी बारावी विद्यार्थ्यांचे सत्कार

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुका पेन्शन असोसिएशन देवगड यांच्या नोंदणीकृत संस्थेने आज प्राथमिक शिक्षक भवन येथे विशेष गुणवत्ता प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करत दहावीच्या परीक्षेत कुमारी शिवानी प्रशांत मेस्त्री तिने 97.6 गुण मिळवत देवगड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुमारी मनस्वी विनायक बांदिवडेकर तिने दहावीच्या परीक्षेमध्ये 92.5 टक्के गुण संपादन करून देवगड तालुक्यामध्ये प्रथम घेण्याचा मान मिळवला या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार , सन्मानपत्र शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.

यावेळी देवगड तालुका पेन्शन असोसिएशनचे पदाधिकारी नारायण गोगटे प्राध्यापक सुरेश सोनटक्के राजेंद्र राणे, राजेंद्र मोंडकर, विलास रूमडे, दत्तात्रय किरकिरे, विलास करंजेकर, व पालक हजर होते यामध्ये श्री सोनटक्के, राणे, रूमडे, गोगटे यांनी आपले यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित त्यांचे आभार दत्तात्रय किरकिरे यांनी व्यक्त केले