शेतमळे पूर्वीसारखे बहरू द्या, यासाठी कृषी योजनांचा लाभ घ्या- अँड अजित गोगटे

80

शेतमळे पूर्वीसारखे बहरू द्या, यासाठी कृषी योजनांचा लाभ घ्या- अँड अजित गोगटे

देवगड (प्रतिनिधी)दि २९ मे २०२४

शेतजमिनी पड राहणार नाहीत याची काळजी घेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञाचा अवलंब करून भात पीक उत्पादन घेतले पाहिजे. शेतमळे पूर्वीप्रमाणे बहुरूद्या यासाठी कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी जामसंडे येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात केले.
भाजप किसान मोर्चाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना भात पिकाच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जामसंडे येथील खरेदी विक्री संघाचे सभागृहात करण्यात आली होते. यावेळी देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून अँड गोगटे बोलत होते.यावेळी मंचावर अँड गोगटे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, फोंडाघाट येथील कृषी संशोधन केंद्राचे विजय शेट्टी चारुदत्त सोमण, भाई बांदकर तसेच अन्य उपस्थित होते.
भातशेती हा पारंपारिक विषय घेऊन तरुणांना भातशेती करण्याच्या प्रवृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे. अँड गोगटे यांनी तालुक्याच्या विविध भागात पूर्वी भातशेतीने बहरलेले दिसणारे शेतमळे अलीकडे ओसाड जाणवतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातशेती करून उत्पादन वाढवावे.अधिक उत्पादन झाल्यास शासन पातळीवर भात खरेदी करण्याची सोय आहे असे गोगटे यांनी सांगितले.
यावेळी भातशेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करताना श्री शेट्ये यांनी शेतीमधील बारकावे सांगितले आवश्यक वाटल्यास केव्हाही आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले.तर श्री घाडगे यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. तालुक्यासाठी सुमारे ३६ कृषी सहाय्यक आवश्यक असताना ही संख्या केवळ १२ इतकीच असल्याने एका कृषी सहाय्यकाकडे सुमारे ८ गावे असल्याचे सांगितले. गरजेनुसार त्यांच्याशी संपर्क साधावा असेही घाटगे यांनी सांगितले. प्रास्ताविकात बांदकर म्हणाले, कार्यक्रमाचा उद्देश गरज आणि आवश्यकता स्पष्ट करून शेतकऱ्यांनी भात पिकाकडे वळण्याचे आवाहन केले दरम्यान यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भात बियाण्याचे वाटपही करण्यात आले.