असलदे डामरेवाडी येथे कार व खाजगी आराम बस यामध्ये अपघात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागांचे नुकसान
कणकवली (प्रतिनिधी)२४ मे २०२४
देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी बस थांबा जवळील वळणावर शुक्रवारी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास खाजगी आराम बस व कार यामध्ये अपघात झाला. या अपघातात कारमधील महिला प्रवासी जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपलब्ध माहिती नुसार, देवगडहून मुंबईच्या दिशेने जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच ०१ सी आर ७९०० व सांगलीहून देवगडकडे जाणारी कार क्रमांक एम एच १० बी एम ८०३४ यामध्ये देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी येथील वळणावर अपघात झाला. या अपघातात कारमधील जखमींना
नरेंद्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार व खाजगी आराम बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.








