देवगड (प्रतिनिधी) २३ मे २०२४
देवगड तुळशीकाटे येथे कलम बागायतीला आग ; सुमारे दोन लाखांचे नुकसान
देवगड तुळशी काटे येथे श्री तुषार तुकाराम भाबल यांच्या कलम बागेला आग लागून 20 हापूस आंबा कलमे होरपळलीआहेत तर काही जाळून खाक झाली असल्याचे समजते. या आगीत भाबल यांचे अंदाजे सुमारे 2 ते सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले .तरी घटनेची पाहणी जामसंडे तलाठी तसेच कृषी अधिकारी यांनी करून पंचनामा केला व नुकसान 2 लाख रुपये झाले असे प्राथमिक अंदाजाने सांगितले आहे .मात्र ही आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही






