देवगड महाविद्यालयाची मनस्वी बांदिवडेकर ९२.५०% गुण मिळवत देवगड महाविद्यालयात प्रथम

415

देवगड (प्रतिनिधी) दि. २१ मे २०२४

देवगड महाविद्यालयाची मनस्वी बांदिवडेकर ९२.५०% गुण मिळवत देवगड महाविद्यालयात प्रथम

   

        फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ असून त्यामध्ये  श्रीमती एस एन वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड या महाविद्यालयाचा निकाल ९७.१३ टक्के लागला आहे.या महाविद्यालयात कु . मनस्वी विनायक बांदिवडेकर ही वाणिज्य शाखेची मुलगी ६०० पैकी ५५५ गुण ९२.५०.% मिळून चारही शाखेत महाविद्यालय सर्वप्रथम आली आहे.

  यामध्ये विज्ञान शाखेचा १००% कला (१९५ पैकी १९५ उत्तीर्ण)  कला शाखेच्या ९०.३९% (१७७ पैकी १६० उत्तीर्ण) वाणिज्य शाखेच्या ९९.५३% (२१३ पैकी २१२ उत्तीर्ण)तर एमसीव्हीसी शाखेच्या १००%(४२ पैकी ४२ उत्तीर्ण)
  
 देवगड महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेतून मनस्वी विनायक बांदिवडेकर ९२.५०% प्रथम क्रमांक, सोहम जितेंद्र मुंडकर ८८.१७% द्वितीय क्रमांक,अलिमा आश्पाक खान ८६.३३% तृतीय क्रमांक.

विज्ञान शाखेतून कुमारी वेदांत वेदांती जितेंद्र पिसे ८२.३३% प्रथम क्रमांक, मनस्वी रमाकांत नाईक ८०.३३% द्वितीय क्रमांक, पद्मजा प्रसाद घाडी ७९.६६% तृतीय क्रमांक

कला शाखेतून हर्ष दीपक जाधव ७८.५०% प्रथम क्रमांक, सुचिता लक्ष्मण मांजरेकर ७३.५०% द्वितीय क्रमांक, सानिका सतीश गोईम ७०%  तृतीय क्रमांक.

एमसीव्हीसी शाखा कस्तुरी संजय घाडी ८३.६७% प्रथम क्रमांक, सानिया अनिल कुळकर ८२.१७% द्वितीय क्रमांक, अपूर्वा अजय शिर्सेकर ७९.१७% तृतीय क्रमांक

या सर्वांचे संस्था पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक वृदांनी अभिनंदन केले.