शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा १००% टक्के निकाल
फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एच एस सी ( १२ वी ) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन घोषित झाला असून शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, या दोन्ही शाखेचा निकाल १००% टक्के एवढा लागला आहे.या परीक्षेसाठी दोन्ही शाखेतील एकूण १४१ विद्यार्थी बसले होते त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .या सर्व विद्यार्थ्यांचे शिरगाव हायस्कूलचे संस्थाचालक मुख्याध्यापक , शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले