कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली येथे १२ मे रोजी स्नेह मेळावा 

130

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली येथे १२ मे रोजी स्नेह मेळावा 

सर्व माजी विद्यार्थी,आजी- माजी शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे

माजी विद्यार्थी संघाचे सत्यवान परब आणि दीपक दळवी यांनी केले आवाहन 

कणकवली ( प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस्, कळसुली येथे कळसुली शिक्षण संघ, मुंबई संस्थेच्या प्रेरणेने आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या सहकार्याने रविवार दि. १२ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजता स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

प्रशालेचे माजी विद्यार्थी तसेच आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माहेरवाशींनी, हितचिंतक, संस्था पदाधिकारी व सदस्य यांचा स्नेहमेळावा श्री. पी. एस. दळवी ,अध्यक्ष, कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रसाद वामन देवधर अध्यक्ष भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, झाराप, कुडाळ हे उपस्थित राहणार आहेत. याचवेळी बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्घाटन आयोजित करण्यात आलेले आहे.

स्नेह मेळाव्या निमित्त दुपारी १ ते १:३० वाजता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कळसुली शिक्षण संघ मुंबई
कार्याध्यक्ष – श्री. सुर्यकांत राजाराम दळवी,सचिव – श्री. विजय पांडुरंग सावंत,खजिनदार श्री. जय मारुती दळवी, श्री.व्ही.व्ही. वगरे मुख्याध्यापक, कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली,श्री. सचिन पारधीये,सरपंच,श्री. जयवंत सुरबा घाडीगावकर,उपाध्यक्ष, शिक्षक पालक संघ,श्री.शिवाजी साबाजी गुरव अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,श्री.के.आर. दळवी,अध्यक्ष, स्कुल कमिटी, कळसुली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष – श्री. सत्यवान पांडुरंग परब,कार्याध्यक्ष श्री. हनुमंत नागेश सावंत, उपकार्याध्यक्ष – श्री कमलाकर बाबाजी राणे उपसचिव – श्री. विश्वास राजाराम दळवी उपस्थित राहणार आहेत.

या स्नेह मेळावा कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी,आजी- माजी शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष श्री.सत्यवान पा. परब,
सचिव- श्री. दिपक विठोबा दळवी यांनी केले आहे.