३०० पेक्षा जास्त जागा घेऊन इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल – उध्दव ठाकरे

119

३०० पेक्षा जास्त जागा घेऊन इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल – उध्दव ठाकरे

मोदी,शहा,राणे यांचेवर ठाकरी शैलीत टीका

कणकवली (प्रतिनिधी) ३ मे २०२४

भाजपात या ही मोदी गॅरंटी देशात सुरू आहे. शूरा मी वंदिले ही महाराष्ट्राची परंपरा पण सध्या चोरा मी वंदिले ही भाजपाची ओळख झालीय. ४ जूनला ३०० पेक्षा जास्त जागा घेऊन इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल.

मोदी शहा घराणेशाही नको म्हणतात. मी अभिमानाने सांगतो ठाकरेंची घराणेशाही आहे.मोदी शहा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही माझ्या वडिलांचे नाव न लावता स्वतःच्या वडिलांचे नाव लावून जनतेसमोर या.मोदी शहा हे दोन्ही सुरतवाले महाराष्ट्र लुटत आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर हे लुटलेले वैभव मी पुन्हा आणेन.अशा शब्दात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी ठाकरी शैलीत विरोधकांना खडेबोल सुनावले.

रत्नागिरी,सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राउत यांच्या प्रचारार्थ आयोजित कणकवली येथील जाहीर सभेत बोलत होते.यावेळी इंडिया महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

            ठाकरे पुन्हा म्हणाले, बेअक्कली
जनता पार्टीचे नेते अमित शहा नकली
शिवसेना म्हणतात. बेअक्कली जनता पार्टीचे सरदार मला हिंदुत्वावर आव्हान देतात. मी म्हणतो हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला.बाळासाहेब काय म्हणता ? बाळासाहेब तुमच्या वर्गात होते काय ? हिंदुहृदयसम्राट म्हणा असे बोलही ठाकरे यांनी शहा यांना कणकवलीतल्या प्रचार सभेत सुनावले.
केंद्रीयमंत्री महायुतीचे उमेदवार नारायण राणेंवर ही भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव यांनी ठाकरी भाषेत आसूड ओढला. म्हणे येऊन दाखव, बघ
गाडून पुढे जाईन असे ठाकरी शब्द सुनावले.मला सावरकरांवर बोलायला सांगता मग अमितजी शामप्रसाद मुखर्जी बद्दल बोला.नारायण राणेंना बाळासाहेबांनी गेट आउट म्हटले होते. २००५ साली सिंधुदुर्गात राणेनी दहशत पसरवली होती. राजकीय हत्यांची सिंधुदुर्गात मालिका सुरू होती. या हत्येचा शोध केंद्रीयमंत्री म्हणून शहांनी लावावा. तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. जो आकस तुम्ही महाराष्ट्राला दाखवताय त्याचे उट्टे काढणार. मोदींनी नेव्ही डे ला येऊन कोकण विकासाची घोषणा तर
केली नाही उलट इथला पाणबडी प्रकल्प गुजरात ला नेला. सगळे चांगले उद्योग गुजरातला नेताय. गुजरातला रांगोळी आणि महाराष्ट्रला राख देताय. मी रिफायनरी होऊ देणार नाही हे जगजाहीर सांगतो, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सांगा रिफायनरी नको म्हणून. कोरोनाची खिचडी उद्धवने खाल्ल्याचा आरोप करताय. गुजरात
उत्तरप्रदेश मध्ये सामूहिक चिता पेटवल्या. उत्तरप्रदेश मध्ये गंगेत प्रेते वाहत होती. महाराष्ट्राने कोरोनाचा यशस्वी लढा दिला. पीएम किसान मधून वर्षाला 6 हजार देतात पण आमच्या खत, बी बियानावर कीटकनाशके, औजारेवर जीएसटी लावून दसपट लुटतात. जीएसटी ची कर प्रणाली आम्ही बदलणार आहोत. चंदा दो धंदा लो ही भाजपाची नीती. ते इलेकंट्रोल बॉण्ड मधून देशाने पाहिले.

चिपी विमानतळाचे मी उदघाटन केले. आज त्याची अवस्था बिकट आहे, मोदींनी केवळ कोपराला गुळ लावला.देशात इंडियाचे आघाडी सरकार आल्यास ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. राणेंच्या खाजगी मेडिकल कॉलेजला मी मुख्यमंत्री असताना परवानगी दिली.शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात सुरू
केल्याचा मला अभिमान आहे. स्वतःच्या मेडिकल कॉलेज चा धंदा व्हावा म्हणून शासकीय कार्डियाक कॅथ लॅब सोलापूरला पाठवली. 2 कोटी नोकऱ्या देणार होता . त्याचे काय झाले ? असेही ठाकरे म्हणालेत.