उद्धव ठाकरे आले जिल्ह्यात,आणि त्यांचे कार्यकर्ते गेले भाजपात ; आमदार नितेश राणे यांचा मास्टर स्ट्रोक
कणकवली (प्रतिनिधी)३ मे २०२४
तोंडवली बावशी बोभाटेवाडीतील उबाठा सैनिकांनी केला भाजपात प्रवेश
महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कणकवलीत आले होते.ठाकरे यांची जाहीर सभा सुरू असताना उबाठा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख असताना उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश म्हणजे आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंच्या जिल्ह्यात स्वागताचा दिलेला मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल.
सिंधुदुर्गचे राजकीय केंद्रबिंदू असलेल्या कणकवली कधी काय होईल याचा नेम नाही.एकीकडे जाहीर सभा तर दुसरीकडे जाहीररीत्या पक्षप्रवेश असे चित्र आज कणकवलीत पहावयास मिळाले. तोंडवली बावशी बोभाटेवाडी येथील शिवसैनिकांनी हा पक्षप्रवेश केला.
भाजप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये,ज्ञानेश्वर मोर्ये, सत्यवान मोर्ये, विठ्ठल मोर्ये , प्रमोद मोर्ये, चंद्रकांत बोभाटे, स्नेहा मर्ये, संजना मर्ये, मनिप्पा आवळे, सदानंद आवळे, पूर्वा मर्ये, सौरभ बोभाटे राजेश बोभाटे प्राजक्ता मर्ये समता मर्ये आदी शिवसैनिकांचा समावेश आहे.




