मिठबाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ठाकरे ,पवार, राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले टीकास्त्र
देवगड प्रतिनिधी
शरद पवार शेतकरी आणि महागाई यासाठी मी अस्वस्थ होतो असे उत्तर दिले. एखादा प्रश्न कसा तोलवा-तोलवी करावा हे शरद पवार यांच्याकडून शिकावे. आज शरद पवारांचे वय ८४ आहे.मी राजकारणी आहे मी सर्वांचा अभ्यास केलाय शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्षे जगले नसते. आजकाल मनुष्य अस्वस्थ झाला की ५०,५५ वय झालं की त्याला अटॅक येतो . कितीही वादळवारे आले तरी शरद पवार बिंदास असतात त्यांना काही होत नाही. त्यांची अस्वस्थ ही अस्वस्थता ही भाजपा सरकारमुळे आहे हे दिसून येते . अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांवरही टीकास्त्र सोडले.मोदी म्हणतात शरद पवार आपले मित्र आहेत पण पवार साहेब चांगल्याला चांगले म्हणणे हे माणुसकीचा धर्म आहे निदान ते जमत नसेल तर निदान वाईट तरी म्हणू नका असा टोलाही राणे यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमार्फत देवगड तालुक्यातील किंजवडे व कुणकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातील मेळावा मिठबाव येथील गणेश मंगल कार्यालय तर किंजवडे जिल्हा परिषद गटाचा मेळावा येथील महालक्ष्मी मंदिर येथे संपन्न झाला. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री राणे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार ,खासदार विनायक राउत यांच्यावर जोरदार टीका केली. या मेळाव्याला आमदार नितेश राणे ,माजी आमदार अँड अजित गोगटे, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके, सुभाष मयेकर, बापू धूरी मनसे तालुकाप्रमुख संतोष मयेकर भांडुप विधानसभा सचिव संजय धुरत अर्बन बँक अध्यक्ष सदाशिव ओगले, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस मिठबाव सरपंच भाई नरे ,सरपंच रवींद्र ठूकरूल ,माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, सावी लोके माजी सभापती सुनील पारकर विश्राम गाडी आदीं पदाधिकारी उपस्थित होते.
राणे पुढे म्हणाले ,बनवाबनवी करून राजकारण करणे व स्वतःचा स्वार्थ साधणे हे काम उद्धव ठाकरे यांनी केले. ५० कोटी साठी जैतापूर प्रकल्पाला विरोध केला. त्यांना कोकण बद्दल आस्था ,प्रेम नाही, तर आकस आहे. अशी घणाघाती टीका रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. नारायण राणे यांनी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर व किंजवडे जिल्हा परिषद गटात आयोजित केलेल्या कार्यकर्ते संवाद मेळाव्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मिठबाव येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली.
काँग्रेसने सत्ता काळात ८० वेळा संविधानात बदल केला. आणि आता भाजपा सत्तेत आल्यास संविधानाला धोका आहे असे चुकीचे आरोप करत आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा रक्षणासाठी जन्म झाला बाळासाहेबांनी आपल्या हयातीत शिवसेना वाढवली .मात्र शिवसेनेच्याच हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळविले. जैतापूर प्रकल्पाला विरोध केला कोळसा कंपनीशी ५० कोटीची मांडवली करून पाच कोटी रुपये घेतले. असा आरोपही केला .ज्यांच्याकडे पाच खासदार आहेत. ते ज्यांचे ३०० पेक्षा जास्त खासदार आहेत त्या मोदींना तडीपार करण्याची भाषा करत आहेत. या निवडणुकीत तीन खासदार निवडून येणार नाहीत. टक्केवारीसाठी रस्त्याची कामे अडविणाऱ्यांनी बालवाडी तरी सुरू केली का ? केवळ शिव्या देऊन कोकणची संस्कृतीचे बिघडविण्याचे काम ठाकरे व त्यांचे सहकारी करीत आहेत असा आरोप राणे यांनी केला. कोरोनाच्या औषधांमध्ये ही १५ टक्के कमिशन खाल्ले याची चौकशी सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिव्यांचे प्रदूषण येथे खपून घेणार नाही असा इशारा राणे यांनी दिला. शरद पवार शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी अस्वस्थ झाले परंतु चार वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्री अशी पदे भूषवली ते कधी शेतकरी व महागाई साठी अस्वस्थ का झाले नाहीत.आज त्यांचे वय ८४ आहे पण आतापर्यंत शरद पवार कधीही अस्वस्थ झाले नाहीत कारण अस्वस्थ असलेल्या माणसाला अटॅक येतात मात्र ते शेतकऱ्यांसाठी कधीही अस्वस्थ नसून ते भाजपा सरकारमुळे अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.
कोकणच्या माथ्यावर सिडको आणू पाहत आहेत अशा खोटा आरोप विनायक राऊत करीत आहेत. कायम टीका करणे व विकास कामाला विरोध करणे हे एककलमी काम करणाऱ्या राऊत यांनी खोटे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. जोपर्यंत राणे आहेत तोपर्यंत सिडको किंवा येथील जनतेवर अन्याय होणारी गोष्ट होणार नाही. विनायक राउत हे खोटारडे आहेत असा आरोप राणे यांनी केला .

आमदार नितेश राणे यांनी खासदार राऊत यांच्यावर घणाघात केला सिडको विषयावर राऊत यांनी व्यासपीठावर आमने-सामने घेऊन बोलावे. सिडको बाबत जनतेमध्ये भीती पसरविण्याचे काम राऊत करीत आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षात फक्त बीएसएनएल टॉवर उभे करण्याचे काम पूर्ण केले परंतु त्या टॉवरचे नेटवर्क मिळते का याची खात्री करावी असे आव्हान आमदार राणे यांनी केले. राऊत यांनी सत्तेत असताना येथील प्रमुख सीआरझेडचा प्रश्न का सोडवला नाही फक्त राणे यांच्यावर टीका हे एकमेव काम खासदार राउत यांनी केले. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली यावेळी अँड अजित गोगटे सदाशिव ओगले बापू धूरी संतोष मयेकर यांनी आपली विचार व्यक्त केले प्रास्ताविक संदीप साटम यांनी केले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






