नाद येथिल श्री देवी नवलाईचा ४ मे रोजी वर्धापनदिन सोहळा

150

नाद येथिल श्री देवी नवलाईचा ४ मे रोजी वर्धापनदिन सोहळा

देवगड (प्रतिनिधी)२ मे २०२४

देवगड तालुक्यातील नाद गांवचे जागृत ग्रामदैवत श्री देवी नवलाईचा २० वा वर्धापनदिन सोहळा ४ मे रोजी पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.
वर्धापदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ४ मे रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन, पुण्याहवाचन, ९ वाजता देवीवर महाअभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, देवी वर्धापनयाग प्रारंभ, ११ वाजता बलिदान पूर्णहुती, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, ओटी भरणी समारंभ, सायंकाळी ३ वाजता महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम, ६ वाजता रत्नागिरी भांबेड येथील ह.भ.प. दिगंबर महाराज मोरे यांचे यांचा कीर्तन कार्यक्रम, रात्रौ १० वाजता राजापूर येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ बुवा गणेश जांभळे आणि कुडाळ पावशी येथील श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ बुवा अरुण घाडी यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. वर्धापनदिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त मानकरी, पदाधिकारी आणि नाद ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.