सुधारित अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे

76

सुधारित अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे

देवगड (प्रतिनिधी ) ,२ मे २०२४

देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू न झाल्याने तेथील पाणीटंचाई भेडसावत असल्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी पुन्हा गटविकास देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन आश्वासन मिळून एक काम सुरू न झाले झाले नाही याकडे लक्ष वेधले व काम सुरू करणेबाबत लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थगित करणार नाही. असा पवित्र घेतलं ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र नंतर प्रशासनाने दखल घेऊन संबंधित कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून काम तात्काळ सुरु करणे बाबत लेखी पत्र दिले नंतर तूर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजनेचे काम मुदत संपूर्ण अवस्थेत आहे याबाबत ग्रामस्थांनी 25 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेतली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आठ दिवस होऊनही काम सुरू न केल्याने साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्या समवेत गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या दालनात भेट घेतली यावेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील उपस्थित होते.
विलास साळसकर यांनी यावेळी एन टंचाई काळात साळशी धनगरवाडी येथील नळ योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा निवेदनाद्वारे दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याप्रमाणे उपोषण बसावे लागेल तसेच निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवावा लागेल असा इशारा दिला. यावेळी गटविकास अधिकारी यादव यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी अभियंता श्री महाजन शाखा अभियंता सूर्यवंशी तसेच संबंधित काम करण्यात एजन्सी यांच्याबरोबर चर्चा करून या कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून काम तात्काळ सुरू करावे अशा सूचना दिल्या. जोपर्यंत सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे व काम तात्काळ सुरू करण्याचे लेखी पत्र संबंधित ठेकेदार एजन्सीला देत नाही तोपर्यंत आम्ही निर्णयावर ठाम असल्याचे साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी यादव पोलीस निरीक्षक अरुण देवकर शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर व ग्रामस्थ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कार्यकरीअभियंता महाजन यांनी संबंधित एजन्सीला जलजीवन मिशन अंतर्गत साळशी धनगरवाडी विहिरीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व सुधारित जागेमध्ये विहीरीचे काम चालू केल्यास होणाऱ्या बदलानुसार आवश्यक ती सुधारित अंदाजपत्रक दोन दिवसात कार्यालयात सादर करावे असे लेखी पत्र दिले यानंतर साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थ यांनी उपोषणाचा निर्णय तुर्तास स्थगित करीत आहोत अशी माहिती ग्रामस्थ व शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी यावेळी गावचे उपसरपंच कैलास गावकर ग्रामस्थ प्रभाकर साळसकर वनिता खरात विक्रांत नाईक मंगेश नाईक रमेश खरात रामचंद्र खरात बापू खरात सुजय खरात .आदी उपस्थित  ग्रामस्थांना दिली.