कणकवली शहरात बिजलीनगर, नाथ पै नगर येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ

22

कणकवली शहरात बिजलीनगर, नाथ पै नगर येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ

नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जात केला प्रचार

कणकवली दि.२९ एप्रिल (प्रतिनिधी)

कणकवली शहरातील बिजलीनगर व नाथ पै नगर येथील वार्ड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराची सुरवात नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. शहरातील नागरिकांशी संवाद साधतं खासदार विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. आपल्या वार्ड मधून खासदार विनायक राऊत यांना जास्तीत जास्त मतादिक्य मिळवून देणार असे आश्वासन नाईक यांनी दिले. यावेळी सुशांत नाईक यांनी मतदारांशी संवाद साधता असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचे दिसून आले. जनतेतून महागाई व बेरोजगारी विरोधाचा नारा यावेळी बघायला मिळाला असे नाईक यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सुशांत नाईक यांच्या सोबत युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, वनिता सामंत.बंड्या नाईक.समीर देसाई. किरण कदम.सागर सुतार.उत्तम सुद्रिक. रवी भंडारे.चौरे.साई परब.लक्ष्मण हन्नीकोड आदी शिवसैनिक उपस्थित होते.