महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ (शिवसेना उबाठा गट) नितीन बानगुडे पाटील यांची देवगड व पडेल येथे होणार जाहीर सभा

37

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ (शिवसेना उबाठा गट) नितीन बानगुडे पाटील यांची देवगड व पडेल येथे होणार जाहीर सभा

शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मिलिंद साटम,युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचे संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

देवगड, प्रतिनिधी दि. २५ एप्रिल २०२४

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार खास.विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन शनिवार दि. २७ एप्रिल रोजी पडेल येथे सायं
४ वा. व देवगड या ठिकाणी सायं. ६.३० वा.करण्यात आले असून या सभेपूर्वी जामसंडे स्टॅन्ड ते देवगड कॉलेज नाका पर्यंत मशाल रॅलीचे
आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना उबाठा गट
तालुका प्रमुख मिलिंद साटम युवा
सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
देवगड येथील उबाठा गट शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, तुषार भाबल उपस्थित होते.
27 एप्रिल ला होणाऱ्या या जाहीर सभेला जिल्हा संपर्क प्रमुख
अरुण दुधवडकर आम. वैभव नाईक
, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सुशांत
नाईक सतीश सावंत, अतुल रावराणे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाप्रमुख,युवक पदाधिकारी उपस्थित राहणार असे यावेळी गावकर यांनी सागितले.तरी या सभेस महाविकास आघाडीच्या
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.