माऊली सोनुली देवतेचा प्रतिष्ठापना सोहळा 29 एप्रिल ते 1 मे  रोजी 

116

माऊली सोनुली देवतेचा प्रतिष्ठापना सोहळा 29 एप्रिल ते 1 मे  रोजी 

सावंतवाडी (प्रतिनिधी) दिनांक २४ एप्रिल २०२४

सावंतवाडी तालुक्यातील दक्षिण कोकणच पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीदेवी माऊली सोनुली देवतेचा प्रतिष्ठापना सोहळा 29 एप्रिल ते 1 मे असा निश्चित करण्यात आला आहे.श्रीदेवी माऊली ची जत्रा ही लोटांगणची जत्रा म्हणून प्रसिद्ध असून दक्षिण कोकणच पंढरपूर म्हणून या देवस्थानची सर्व दूर ख्याती आहे.बऱ्याच दिवसानंतर देवाच्या कृपाशीर्वादाने हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा ठरल्याने भाविकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे.