डांबरे येथील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश

74

डांबरे येथील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली दि २१ एप्रिल ( प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील डांबरे गावातील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव,यांनी आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले .आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून डांबरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रघु जाधव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच बबलू सावंत, डांबरे सरपंच किरण कानडे, ग्रामपंचायत .स‌दस्य संतोष मेजारी, उपसरपंच सागर साटम, संदीप साटम, सुमित मेजारी, प्रथमेश दळवी, आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते..