रिफायनरी प्रकल्पासाठीच नारायण राणेंना उमेदवारी ;जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका

61
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

रिफायनरी प्रकल्पासाठीच नारायण राणेंना उमेदवारी ;जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका

देवगड (प्रतिनिधी)दि १९ एप्रिल २०२४ 

कोकणामध्ये विनाशकारी औष्णिक आणि रिफायनरी प्रकल्प आणण्यासाठीच भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी ची घोषणा शेवटच्या यादीत होणे हाच राणेंचा नैतिक पराभव आहे अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व उबाठा शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख सतीश सावंत यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या देवगड शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे उपस्थित होते यावेळी बोलताना सावंत म्हणाले लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते कणकवली विधानसभा मतदारसंघातून जोमाने काम करीत विनायक राऊत यांना मोठे मताधिक्य देतील असा विश्वास व्यक्त केला भाजपचे आमदार नितेश राणे हे सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत राज्यात खोके देऊन विधानसभेचे आमदार फोडले तसेच सिंधुदुर्गात पेट्या देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते फोडण्याचे काम आमदार राणी करीत आहेत मात्र सिंधुदुर्गात फोडाफोडीच्या राजकारणाला जनता चूक उत्तर देते सन 2013 14 च्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सात जि प सदस्यांना पडूनही राणेना पराभव पत्करावा लागला हे त्यांनी ध्यानात ठेवावे पैशाच्या घमेंडीवर कार्यकर्ते व पदाधिकारी फोडत असल्याने त्याची चीड जनतेत आहे
त्यामुळे जनता यावेळी राणेंचा पराभव करणार हे अटळ आहे, असे ते म्हणाले.

राणेंनी ३४ वर्षात काय विकास केला

खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात काय केले असा प्रश्न विचारत असता मग गेल्या 34 वर्षात प्राण्यांनी सत्तेत राहून जिल्ह्याचा काय विकास केला त्याचा हिशोब आधी द्यावा आमदार नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षात कणकवली विधानसभेचे आमदार म्हणून काम करताना देवगड शहराचा पाणी प्रश्न आंब्या फळाला हमीभाव मच्छीमारांचे प्रश्न आणि रेंगाळलेला आनंदवाडी प्रकल्प का सोडवता आला नाही याचे उत्तर द्यावे केवळ रस्त्याची कामे टक्केवारीसाठी घेऊन विकास केल्याचे आभास निर्माण करत आहेत
कोकणात विनाशकारी औष्णिक अणुऊर्जा व ग्रीन रिफायनरी प्रकल्पांना शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे आणि हा विरोध कायम राहणार आहे त्यामुळे हे प्रकल्प व्हावे त्यासाठी नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी देऊन या प्रकल्पांची सुपारी दिली आहे असा गणाघात सावंत यांनी केला

धनुष्यबाण चिन्ह नसल्याने फायदा मशालीला

शिंदे गट शिवसेनेला रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने या मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्ह आता दिसणार नाही याही लढत मशाल आणि कमळ या दोन चिन्हांवर मध्येच असेल जनतेला आता माहीत झाले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल हे चिन्ह का घ्यावे लागले याची कल्पना जनतेला आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक हा मशालीलाच मतदान करेल आणि विनायक राऊत यांचा विजय निश्चित असेल असे ते म्हणाले

भाजप प्रवेशाच्या त्या अफवाच

आमदार नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश केला आता पुन्हा तेथे जाण्याची चूक करणार नाही आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत असेही ते म्हणाले.