जयप्रकाश पुतळाजी तानवडे यांचे निधन
कणकवली (प्रतिनिधी)
शिवडाव तांबटवाडी गावचे रहिवासी व सध्या मुंबई डोंबीवली येथे वास्तव्यास असलेले जयप्रकाश पुतळाजी तानवडे (५६) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक लहान मुलगी , आई , चार भाऊ , भावजय , पुतणे , पुतण्या असा परिवार आहे. कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक डी .पी.तानवडे यांचे ते धाकटे बंधू होत.





