रामनवमी निमित्त आरोस येथे नटसम्राट नाटकाचे होणार सादरीकरण

86

रामनवमी निमित्त आरोस येथे नटसम्राट नाटकाचे होणार सादरीकरण

बांदा (मंगल कामत ) दि. १५ एप्रिल २०२४

नांकबांदा – गिरोबावाडी येथे रामनवमिनिमित्त बुधवार १७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता गिरोबा युवक नाट्यमंडळातर्फे वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट हे तीन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन व आप्पासाहेब बेलवनकरची मुख्य भूमिका प्रवीण मांजरेकर यांनी साकारली आहे. मराठी रंगभमीवरील अजरामर नाटक व मराठी रंगभूमीच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे नटसम्राट नाटक. हेच नाटक सादर करण्याचे शिवधनुष्य आरोस गिरोबा युवक नाट्यमंडळाने उचलले आहे. यापूर्वी या मंडळाने वस्त्रहरण, गेले भजनाक पोचले लग्नाक , गावकी या तीन नाटकाचे अप्रतिम सादरीकरण करून अन्य ठिकाणीही प्रयोग केले होते. यावर्षी नटसम्राट नाटक सादरीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे. या नाटकात प्रविण मांजरेकर, निखिल नाईक, महेश कुबल विनायक नाईक, सखाराम नाईक, बाबू नाईक, विशाल नाईक, जनार्दन नाईक, प्रशांत नाईक, गोविंद नाईक, तन्मय नाईक, रवींद्र नाईक, महेश आरोस्कर, प्रकाश पेडणेकर, दिव्या नाईक, वैभवी सोकटे, योगिता सावंत, कीर्ती चव्हाण, निधी शंकर नाईक यांच्या भूमिका आहेत. नाट्यरसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन गिरोबा युवक मंडळ व ग्रामस्थांतर्फे कऱण्यात आले आहे.