किरण सामंतांची चिंता नको ; त्यांच्याबाबत निर्णय घेण्यास महायुतीचे नेते समर्थ -आमदार नितेश राणे

72

किरण सामंतांची चिंता नको ; त्यांच्याबाबत निर्णय घेण्यास महायुतीचे नेते समर्थ -आमदार नितेश राणे

फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही.

कणकवली( प्रतिनिधी)दि १५ एप्रिल २०२४ 

किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार असे सर्वच महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीचा उमेदवार निवडून यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट व्हावे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या विचारांचा खासदार निवडून यावा. या दृष्टिकोनातून प्रचार केला जात आहे. किरण सामंत यांची भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही. किरण सामंत हे राजकारणातील “लंबी रेस चे नेते आहेत. किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत, असे आमदार राणे यांनी सांगितले.