महावितरणचा निष्काळजीपणा बेतणार होता युवकाच्या जीवावर

475
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

महावितरणचा निष्काळजीपणा बेतणार होता युवकाच्या जीवावर

सावंतवाडी (प्रतिनिधी)दि १५ एप्रिल २०२४ 

माजगाव बांदा रस्त्यालगत असलेल्या वीज वहिनीचा जीर्ण खांब या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वर अचानकपणे कोसळल्याने अपघात झाला.या अपघातात सुदैवाने युवक बाल बाल बचावला.मात्र रस्त्यालगतचे जीर्ण पोल बदलण्याच्या कामाकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.या जीर्ण खांबामुळे अपघात घडवून एखादी जीवित हानी झाली तर त्याची जबाबदारी महावितरण कंपनी घेणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे